कौशी (Firmiana colorata)  

कौशीची लहान ते मध्यम उंचीची झाडे (१० ते २० फूट) गावात तुरळक प्रमाणात आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. गिरेश्वर मंदिराच्या आसपासच्या सड्यावर व वाकी-भराड्याच्या सड्यावर कौशीची झाडे आहेत. मार्च-एप्रिलमध्ये येणाऱ्या लालेलाल फुलांनी हे झाड सहज ओळखू येते. त्यानंतर गुलाबी रंगाच्या शेंगांनी हे झाड लगडते. कौशीची फळे आंबटसर असतात व ती खाद्य आहेत. गावात या झाडाला ‘कवस’ असेही म्हणतात. दळवी वाडीत कवसाचे एक मोठे झाड होते.  

  
अधिक माहितीसाठी संदर्भ –
(https://en.wikipedia.org/wiki/Sterculia_colorata)

Share Tweet Follow Share Email Share