केनी
(Commelina benghalensis)
 
 

‘केना’ अथवा ‘केनी’ ही पावसाळ्यात गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. ही वनस्पती जमिनीलगत वाढते. निळ्या टपोऱ्या फुलांमुळे ही ओळखू येते. केनी ही रानभाजी म्ह्णून पावसाळ्यात अनेक ठिकाणी खाल्ली जाते. मात्र गावात रानभाजी म्हणून सर्रासपणे आहारात हिचा समावेश नसतो. गुरं ही वनस्पती चार म्हणून खातात. संपूर्ण पावसाळाभर ही वनस्पती आढळते मात्र फुले जून-जुलैच्या सुमारास फुलतात. आशिया आणि आफ्रिका खंडात या वनस्पतीचा आढळ आहे. या वनस्पतीला ‘कोषपुष्पी’, ‘कंचर’ अशीही नावे आहेत. अनेक ठिकाणी कुर्डू आणि केना यांची एकत्र भाजी करण्याची पद्धत आहे.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1)

Wikipedia (https://en.wikipedia.org/wiki/Commelina_benghalensis)

 

2)

(https://www.facebook.com/vbpatil20may/posts/pfbid0ZtfN4YXERiogJKd3aZXpGM5kkT4TZ8JirJw6JqsVuE53TpFEqBUQPz4jG49GSHoal)

Share Tweet Follow Share Email Share