खोरेती (Ficus exasperata)
 

खोरेतीचे मध्यम उंचीचे (१० ते ३० मीटर) वृक्ष गावात तुरळक प्रमाणात आढळतात. खोरेतीची पाने किंचित पोपटी रंगाची, जाड आणि खरखरीत असतात. एप्रिल-मे च्या सुमारास खोरेतीचे झाड सुपारीएवढ्या पिवळसर फळांनी लगडते. अनेक पक्षी, हॉर्नबिल खोरेतीची फळे खायला येतात. खोरेतीचा औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. याच झाडाला ‘करवत’ असेही एक नाव आहे. खोरेतीची पाने हा ‘नैसर्गिक पॉलिश पेपर’ आहे. पान खरखरीत असल्यामुळे लाकूड घासून गुळगुळीत करण्यासाठी वापरतात.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) (https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3252228/)

2) फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Brahma’s%20Banyan.html)

Share Tweet Follow Share Email Share