किर्पा (Lumnitzera racemosa)    

किर्पा ही कांदळवन प्रजाती गावातल्या कांदळवनात सामान्य प्रमाणात आढळते. पंगेरे, दांडे येथील कांदळवनांत ही आढळली आहे. गावात या वनस्पतीची उंची जास्तीत जास्त ५ ते ८ फुटांपर्यंत नोंदवली गेली आहे. बारीक टिकलीसारख्या पांढऱ्या फुलांवरून ही वनस्पती ओळखता येते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –  (https://www.flowersofindia.net/catalog/slides/Black%20Mangrove.html)
Share Tweet Follow Share Email Share