कोचं 
 

सड्यांवरील कातळांच्या फटींतून रुजणारी, जमिनीलगत, जास्तीत जास्त बोटभर उंच वाढणारी ही वनस्पती गावात ‘कोचं’ या नावाने ओळखली जाते. याच्या पात्या तीक्ष्ण असल्याने अनवाणी फिरताना पायाला बोचतात. गुरं ही वनस्पती खातात. शेरीवाडी, तसेच वाकी-भराडे या सड्यांवर ही सामान्य प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात कोचांना पिवळी व पांढरी बारीक फुलं येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

   

Share Tweet Follow Share Email Share