कोकर 
 

कोकर हा खाडीत भरपूर प्रमाणात आढळणारा मासा आहे. आकार तळहाताएवढा असतो. पूर्ण वाढ झालेले मासे सुपाएवढे मोठे होतात. सावेने वा जाळे टाकून हा मासा पकडला जातो. छोट्या माशाचे वजन १०० ते २०० ग्रॅम, तर मोठ्या माशाचे वजन ५ किलोपर्यंत भरते. हा मासा तळून, वा रस्सा करून खाल्ला जातो. बाजारात हे मासे साधारणतः २५० रु. किलोने विकले जातात.

छायाचित्रे

Share Tweet Follow Share Email Share