छायाचित्र: आशिष पाटील                                                       स्थळ: पंगेरे खाडी

 

 

कोंबट 
 

कोंबट हा पंगेरे खाडीत कमी प्रमाणात आढळणारा मासा आहे. हा मासा नेहमी आढळणारा नाही. हा मासा लहान असताना (अर्धा ते एक फूट) त्याला कोंबट म्हणतात व मोठा झाल्यानंतर  (२ ते ३ फूट) त्याला ‘कानय’ असे म्हणतात. या माशाला ‘गुरय’ असेही एक नाव आहे. लहान कोंबट माशाचे वजन अर्धा ते एक किलोपर्यंत असते व मोठ्या कानय माशाचे वजन १०-१२ किलोपर्यंत भरते. तळून वा शिजवून हा मासा खाल्ला जातो. पूर्वी हा मासा भरपूर प्रमाणात खाडीत मिळत होता, परंतु आता या माशाचे खाडीतले प्रमाण कमी झाले आहे असे ग्रामस्थ सांगतात.सावेने वा जाळ्याने हा मासा पकडला जातो.

Share Tweet Follow Share Email Share