स्थळ – वाकी सडा
दिनांक – ३१/१/२०२२
छायाचित्र – सुहास गुर्जर

कोतवाल (Black Drongo) 

 

कोतवाल हा गावात सर्वत्र नेहमी आढळणारा पक्षी आहे. एका वेळी दोन ते चार च्या संख्येने कोतवाल पक्षी आढळतात. शेवरीच्या व पांगेऱ्याच्या झाडांवर कोतवाल पक्षी जास्ती करून आढळतात. कोतवाल पक्षी पूर्ण काळा असून आकार मध्यम असतो. ‘पांढऱ्या पोटाचा कोतवाल’ (White-bellied Drongo) नावाचा याचा एक प्रकार गावात क्वचित आढळतो. टोळ आणि कीटक हे याचे मुख्य खाद्य आहे. गवत कापणीच्या वेळी वा भाजावळ करताना उडणारे कीटक खाण्यासाठी कोतवाल पक्षी मोठ्या संख्येने एकत्र येतात.

 

Share Tweet Follow Share Email Share