कुडा (Holarrhena pubescens)
 

कुड्याची लहान आकाराची झाडे गावात विशेषतः कातळसड्यांच्या आजूबाजूच्या झुडुपांमध्ये तुरळक प्रमाणात आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. खोड बारीक व राखाडी रंगाचे असते. उन्हाळ्यात कुड्याच्या झाडांना पांढऱ्या शुभ्र रंगाची फुले गुच्छाने येतात. पावसाळ्यात शेंगा येतात. कुड्याच्या फुलांची व शेंगांची क्वचित काही ठिकाणी भाजी केली जाते.
मानवी आरोग्यासाठी कुडा ही अत्यंत औषधी वनस्पती आहे. कुड्याचे तपकिरी रंगाचे पाळ पोटाच्या आजारांवर उपयोगी आहे.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विश्वकोश (https://marathivishwakosh.org/1764/)

2) मराठी विकिपिडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE)

Share Tweet Follow Share Email Share