कुळीथ 

कुळीथ हे गावात अल्प प्रमाणात घेतले जाणारे पीक आहे. आखेऱ्याचा मळा, दांडे, म्हैसासूर वाडी येथे अल्प प्रमाणात कुळीथ पिकतो. कुळीथ हा गावातील लोकांच्या आहारातला एक मुख्य घटक आहे. कुळथाचे पिठले हे गावातील लोकांचे आवडते खाद्य आहे. गावात काही मळ्यांमध्ये नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दोनदा कुळीथाचे पीक घेतले जाते. कुळीथ तयार झाल्यावर तो उपळून काढला जातो व झोडून शेंगा वेगळ्या केल्या जातात. पिकाच्या उरलेल्या भागाला ‘करं’ म्हणतात व तो गुरांना खाद्य म्हणून उपयोगी येतो. कुळथाचे दाणे वेगळे केल्यावर उरलेल्या टरफलांना ‘गुळी’ असे म्हणतात व तेही गुरांचे आवडते व पौष्टिक खाद्य आहे. कुळीथ भाजून त्याची जात्यावर दळून डाळ करतात. डाळ करताना निघालेली सालंही गुरांना खायला उपयोगी येतात. कुळथाचे पीठ करून ते विकले जाते, तसेच घरात पिठले करण्यासाठी वापरले जाते. अख्ख्या कुळथाची उसळही तुरळक प्रमाणात केले जाते.

Share Tweet Follow Share Email Share