कुंभा (Careya arborea)

कुंभ्याची लहान ते मध्यम उंचीची झाडे गावात तुरळक प्रमाणात आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. जळवणासाठी व भाजावळीसाठी कुंभ्याचे कवळ (बारक्या फांद्या) तोडले जातात. घराचे वासे वा फळ्या पाडण्यासाठी कुंभ्याचे लाकूड वापरतात. उन्हाळ्यात एप्रिल-मे च्या सुमारास कुंभ्याच्या झाडाला पांढरी मोठी भरपूर केसरे असलेली फुले येतात. फळे हिरवी मोठी असतात. पान मोठे लंबवर्तुळाकार असते. पाने पिकल्यावर लाल होतात. काही भागांमध्ये पत्रावळी लावण्यासाठी कुंभ्याची पाने वापरतात.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) विकिपिडिया (https://en.wikipedia.org/wiki/Careya_arborea)

2) (http://wildedibles.teriin.org/index.php?album=Wild-edibles/Leaves/Careya-arborea)

Share Tweet Follow Share Email Share