कुर्डू (Celosia argentea)    

कुर्डू ही वनस्पती पावसाळ्यात गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळते. विशेषतः शेतमळ्यांच्या बाजूने ही वनस्पती खास करून दिसते. कुर्डूच्या पाल्याची गावातले लोक भाजी करतात. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या सुमारास कुर्डू फुलतात व नवरात्रात घराला कुर्डूचे घोस बांधतात.

इंग्रजीमध्ये या वनस्पतीला Silver Cockscomb असे म्हणातात, तर संस्कृतमध्ये ‘मयुरशिखा’ असे नाव आहे. भारतात सर्वत्र, तर आशिया खंडातील अनेक देशांमध्ये ही वनस्पती आढळली आहे. शेताच्या आजूबाजूला कुर्डू असल्यास त्यामुळॆ फुलपाखरे आकर्षित होऊन त्याचा परागीभवनासाठी भातशेतीला फायदा होतो असे काही अभ्यासक सांगतात. या वनस्पतीचे अनेक औषधी उपयोग आहेत. 

अधिक माहितीसाठी संदर्भ –  (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Silver%20Cockscomb.html)
कुर्डू रानभाजी
नवरात्रीला मंडपीला बांधलेला कुर्डूचा घोस
Share Tweet Follow Share Email Share