लाजवंती (Biophytum sensitivum)    

लाजवंती ही गावात पावसाळा अखेरीस तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. ही वनस्पती जमिनीलगत ४ ते ५ इंचापर्यंत वाढते. पानांची रचना आवळा-चिंचेच्या पानांसारखी असते. पावसाळा अखेरीस या वनस्पतीला पिवळी-बारीक फुले येतात. गुरे चरताना ही वनस्पती बरेचदा त्यांच्याकडून खाल्ली जाते वा पायाखाली तुडवली जाते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य कुठला उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Tropical%20Little%20Tree%20Plant.html)
Share Tweet Follow Share Email Share