लूत 
 

लूत ही पावसाळ्यात उगवणारी सुरणासारखी वनस्पती. सुरणाचे खोड पांढरट असते, तर लुतीचे खोड काळपट असते त्यावरून ती ओळखता येते. ही वनस्पती ३ ते ४ फुटांपर्यंत उंच वाढते. ही खाद्य वनस्पती आहे. अनेक भागांत ही पावासाळी रानभाजी म्हणून प्रचलित आहे; मात्र या वनस्पतीला खूप खाज असल्याने गावात ही सहसा आहारात वापरली जात नाही. पूर्ण माहिती नसताना लुतीची भाजी करून खाल्ल्यास शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात असे गावातील लोक सांगतात.
पावसाळ्यात पडवळीच्या मांडवावर लुतीच्या कांड्या टाकून ठेवल्यास वेलाला उंदीर लागत नाही असा स्थानिक लोकांचा अनुभव आहे.

Share Tweet Follow Share Email Share