माणा 
 

माणा ही गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारी बांबूची प्रजाती आहे. माण्याची काठी आतून पोकळ असते व काहीशी वाकडीतिकडी वाढते. चिव्याच्या तुलनेत हा बांबू दुय्यम मानला जातो. एका बेटात सरासरी ५० ते १०० किंवा त्यापेक्षा जास्त काठ्या असतात. बेटातल्या काठ्या विरळ असतात. एकमेकांना चिकटून नसतात. रंग गर्द हिरवा असतो. मांडव घालण्यासाठी, कुंपणासाठी, गुढीसाठी गावातले लोक माण्याच्या काठ्या वापरतात. काठी साधारणतः तीन वर्षांत जून होते. माण्याच्या काठ्यांची बेळंही काढली जातात. गावठाण भाग, बौद्धवाडी परिसर येथे माण्याची बेटे भरपूर आहेत.

 

माण्याच्या काठीची गुढी
माण्याचे बेट
Share Tweet Follow Share Email Share