मणक/कणक  
 

बारीक इंचभर व्यासाच्या काठ्या असलेल्या या बांबूला गावात ‘कणक’ किंवा ‘मणक’ असे म्हणतात. काही लोक याला ‘कणकीचे बेट’, तर काही लोक ‘मणकीचे बेट’ म्हणतात. या बेटात काठ्या एकमेकांना इतक्या घट्ट चिकटून असतात की त्यातली एक काठी तोडून घेणे फार कठीण असते. गावात ही बेटे अत्यंत तुरळक प्रमाणात आहेत. वाकी वाडीत या बांबूच्या ५ पेक्षा जास्त बेटांची नोंद झाली आहे. बाकी गावात कुठे हा बांबू फारसा आढळत नाही. वय करण्यासाठी हा बांबू उपयोगाला येतो. बाकी या बांबूचा गावात विशेष उपयोग केला जात नाही.

Share Tweet Follow Share Email Share