मारांडी (Acanthus ilicifolius)
 
 

मारांडी ही खारफुटीच्या सानिध्यात वाढणारी वनस्पती आहे. गावात दांडे-पंगेरे खाडीपरिसरात ही सामान्य प्रमाणात आढळते. काटेरी लांब पाने व निळी उभी फुले यावरून ही वनस्पती ओळखता येते. गावात काही ठिकाणी शेतजमिनींमध्ये ही वनस्पती आक्रमकपणे पसरलेली दिसते व तिचा शेतकऱ्यांना उपद्रव होतो. काटे असल्यामुळे ही काढून टाकणे कठीण होते. ही वनस्पती साधारणतः २ ते ३ फूट उंच वाढते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

 

गावात काही ठिकाणी शेतजमिनींमध्ये घुसून मारांडी आक्रमकपणे फोफावलेली दिसते.
Share Tweet Follow Share Email Share