मर्यादवेल (Ipomoea pes-caprae)

मर्यादवेल ही दांडे-पंगेरे समुद्रकिनारी विपुल प्रमाणात आढळते. ही वनस्पती जमिनीलगत वाढते. पाने जाड, गोल, लहान असतात. डिसेंबरच्या सुमारास या वेलीला जांभळट गुलाबी रंगाची धोत्र्यासारखी मोठी फुले येतात. समुद्रकिनाऱ्याच्या धूप रोखण्यात या वनस्पतीचा मोठा वाटा आहे. अलीकडे किनाऱ्यावर सुरुची लागवड झाल्याने या वनस्पतीचे प्रमाण कमी झाले आहे. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विश्वकोश (https://marathivishwakosh.org/4104/)

2) Wikipedia (https://en.wikipedia.org/wiki/Ipomoea_pes-caprae)

 

 

 

     

Share Tweet Follow Share Email Share