नाचणा

नाचणा हे गावात अल्प प्रमाणात घेतले जाणारे पीक आहे. भातशेतीमध्ये मिश्र पीक म्हणून नाचण्याचे काही मळ्यांमध्ये नाचण्याचे पीक घेतले जाते. भातशेतीच्या मळ्यात मध्ये मध्ये नाचण्याची टोवणी केली जाते. नाचण्याची शेती व्यावसायिक तत्त्वावर केली जात नाही, तर घरगुती अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी केली जाते. यामध्ये नाचण्याचे गावठी बियाणेच वापरले जाते. नाचण्याची भाकरी हा गावातल्या लोकांच्या आहाराचा मुख्य भाग आहे. गावातल्या बहुसंख्य लोकांच्या रोजच्या आहारात नाचण्याची भाकरी असते; मात्र अलीकडे आहारपद्धती आधुनिक झाल्यामुळे नाचण्याच्या भाकरीचे प्रमाण कमी झाले आहे. नाचण्याचे रोप पाच ते सहा फूट उंच वाढते व ते गुरांना खाद्य म्हणून उपयोगी येते.

Share Tweet Follow Share Email Share