छायाचित्र: श्रीवल्लभ साठे
दि. २४/८/२०१८
स्थळ – लक्ष्मीनारायण वाचनालयाजवळ

नवरंग (Indian Pitta)

नवरंग हा पक्षी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात गावात तुरळक प्रमाणात आढळतो. यावर्षी (२०२२) मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हा गावात दिसायला लागला आहे. एका वेळी एक च्या संख्येने हा पक्षी नजरेस पडतो. याच्या विशिष्ट प्रकारच्या ओरडण्यामुळे हा सहज ओळखू येतो. झुडूपी जंगले, बागा, घराभोवतीच्या परिसरात हा आढळून आला आहे. ‘नऊ रंगांनी युक्त’ म्हणून याला नवरंग असे नाव देण्यात आले आहे. पंख निळे, छाती व पोट तपकिरी, बूड लाल, कंठ पांढरा, डोळ्याभोवतीचा भाग काळा, चोच लालट काळी, पाय लालसर व पिसे काळी असतात. जमिनीवरील, पातेऱ्यातील किडे खातो. पावसाळ्याचा हंगाम या पक्ष्याचा विणीचा हंगाम असतो. या काळात मादीला आकर्षित करण्यासाठी हा मोठमोठ्याने ओरडतो. याच्या ओरडण्यातून “वाईट देव…वाईट देव….वाईट देव……” असे शब्द फुटतात असे गावातले लोक म्हणतात. त्याबद्दल अनेक लोककथा आहेत. भारतात सर्वत्र हा पक्षी आढळून आला आहे. 

 

संदर्भ –

  1. E-bird (https://ebird.org/species/indpit1?siteLanguage=en_IN
  2. Wikipedia (https://en.wikipedia.org/wiki/Indian_pitta#
  3. Bird Count India (https://birdcount.in/migration-map/indpit1/#
  4. (https://www.youtube.com/watch?v=49x21DohefU
Share Tweet Follow Share Email Share