निगडी (Vitex negundo)
 
 

निगडीची लहान उंचीची झुडुपे गावात तुरळक प्रमाणात आढळतात. लांबडी पाने व निळसर फुलांच्या मंजरीवरून निगडीचे झाड ओळखता येते. निगडीचे झाड औषधी आहे. निगडीचा पाला माणसांच्या तसेच गुरांच्या त्वचारोगांवर वापरतात. शेतात उंदीर व अन्य प्राण्यांचा उपद्रव होऊ नये यासाठी निगडीचा पाला उपयोगी पडतो. डासांचा उपद्रव कमी व्हावा यासाठी निगडीच्या पाल्याची धुरी करतात असे स्थानिक लोक सांगतात. ही वनस्पती खाद्य नाही. निगडीचे खुट शेताच्या कुंपणाला उपयोगी पडतात.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) (https://www.youtube.com/watch?v=MW6jeDb5WVc)

2) National Health Portal (https://www.nhp.gov.in/sambhaloo-vitex-negundo-linn_mtl)

Share Tweet Follow Share Email Share