पाठा/पाडावळ (Cissampelos pareira)
 

पाठा / पाडावळ ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. दगडांच्या फटींतून पावसाळ्यात ही रुजून येते. जेमतेम दोन ते तीन फूट वाढते. पाने बदामी आकाराची, लहान, किंचित पोपटी असतात. या वनस्पतीला ‘पाठा’ म्हणावे का ‘पाडावळ’ म्हणावे याबाबत संभ्रम आहे. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य कुठला उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. 

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) Wikipedia(https://en.wikipedia.org/wiki/Cissampelos_pareira;

1) (https://www.facebook.com/groups/426670120680546/posts/3707677085913150/;

Share Tweet Follow Share Email Share