पाणलवंग (Ludwigia octovalvis)    

पाणलवंग ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी पाणवनस्पती आहे. पाणवठ्याच्या ठिकाणी, बागांमध्ये, शेतमळ्यांमध्ये ही आढळून येते. पावसाळ्यात ही जास्त प्रमाणात दिसते. या वनस्पतीची उंची जास्तीत जास्त १ फुटापर्यंत असते. चार पाकळ्यांच्या बारीक पिवळ्या फुलांवरून ही वनस्पती ओळखता येते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

 (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Willow%20Primrose.html)

Share Tweet Follow Share Email Share