पांढरी कोळंबी

पांढरी कोळंबी हा अणसुरे खाडीत आढळणारा कोळंबीचा प्रकार आहे. याची लांबी ३ ते ४ इंच असते. एका कोळंबीचे वजन २० ते ३० ग्रॅम भरते. या कोळंबीला ‘काड’ असेही म्हणतात. डोळी लावून ही कोळंबी पकडली जाते. पावसाळ्यात जास्त प्रमाणात मिळते. बाजारात या कोळंबीला सरासरी २५० रु. किलो भाव आहे.

(माहिती स्रोत – पंगेरेवाडी ग्रामस्थ)

Share Tweet Follow Share Email Share