पांगारा (Erythrina variegata)

पांगाऱ्याची लहान ते मध्यम उंचीची झाडे (१० ते २० फूट) गावात सर्वत्र तुरळक प्रमाणात आढळतात. शेताला, बागेला वय (कुंपण) करण्यासाठी खास करून पांगाऱ्याचे खुट लावतात. पांगाऱ्याचे लाकूड हलके असल्याने इमारती बांधकामाला उपयोगी येत नाही. मात्र पांगाऱ्याचे जून लाकूड पाण्यात कुजत नाही म्हणून विहीर बांधताना मजबुती येण्यासाठी ते तळाशी घालतात. अशी एक ६० वर्षे जुनी विहीर गावात आहे व त्यात तळाशी घातलेले पांगाऱ्याचे लाकूड अजूनही चांगल्या स्थितीत आहे. जानेवारी-फेब्रुवारीच्या सुमारास पांगाऱ्याला लालभडक फुले येतात व त्यातील मध चाखण्यासाठी अनेक पक्षी येतात. पांगाऱ्याच्या बिया दगडावर घासून तापवून चटका लावण्याचा खेळ लहान मुले करतात.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1(https://vishwakosh.marathi.gov.in/20622/)

     

तळाशी पांगाऱ्याचे लाकूड घातलेली ६० वर्षे जुनी विहीर
स्थळ – पंगेरेवाडी

Share Tweet Follow Share Email Share