पायर (Ficus virens)
 

पायरीचे मध्यम ते मोठ्या उंचीचे वृक्ष गावात सामान्य प्रमाणात आहेत. संपूर्ण गावात पायरीच्या १३ महावृक्षांची नोंद झाली आहे. पायर हा वटवर्गीय वृक्ष असून तो झाडावर रुजतो संपूर्ण झाडाला वेढा घालत वाढतो. अनेक वर्षांनी मूळ झाड नष्ट होते पायरीचाच वृक्ष होतो. डिसेंबरच्या सुमारास पायरीच्या महावृक्षांवर फळे खाण्यासाठी भरपूर पक्षी येतात. पायरीचा महावृक्ष असलेल्या ठिकाणी गर्द सावली असते. काही ठिकाणी पायर आणि वड एकत्र वाढलेले दिसतात.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

(https://en.wikipedia.org/wiki/Ficus_virens)

Share Tweet Follow Share Email Share