पेवा 

(Cheilocostus speciosus)

पेवा ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. गावात या वनस्पतीला ‘कोष्ठ’ या नावानेही ओळखतात. आरोग्यम् क्लिनिक, शेवडीवाडी स्टॉप आणि अन्य काही भागांत ही वनस्पती आढळून आली आहे. या वनस्पतीची उंची साधारणपणे ५ फुटांपर्यंत असते. पाने लांबट पात्यांसारखी असतात. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात या वनस्पतीला पांढरी मोठी सुंदर फुले येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

 

या वनस्पतीला मराठीत ‘केवकंद’, तर संस्कृतमध्ये ‘कुष्ठ’ अशीही नावे आहेत. ही वनस्पती आल्याच्या कुळातली असून इंग्रजीमध्ये Crepe Ginger या नावानेही ओळखली जाते. फुलांच्या पाकळ्या क्रेप पेपरसारख्या दिसतात म्हणून याला ‘क्रेप जिंजर’ असे नाव पडले आहे. भारतासह दक्षिण आशियायी देशांमध्ये हिचा मूळ अधिवास आहे. अमेरिका आणि अन्य देशांमध्ये हे शोभेचे झाड म्हणून लावले जाते. आयुर्वेदामध्ये याचे विविध औषधी उपयोग सांगितले आहेत.

स्थळ: - शेवडीवाडी स्टॉपजवळ
Share Tweet Follow Share Email Share