पिंपळ (Ficus religiosa)
पिंपळाचे मोठे वृक्ष गावात सामान्य प्रमाणात आहेत. गिरेश्वर मंदिराच्या पाठीमागील पिंपळाचा महावृक्ष समोरील विजयदुर्ग किल्ल्यावरूनही दृष्टीस पडतो. मारुतीच्या देवळाच्या पारावर दोन पिंपळाची छोटी झाडे आहेत.

पक्ष्यांच्या विष्ठेतून पिंपळाच्या बियांचा प्रसार होतो व पावसाळ्यात विशेषतः दगडांच्या सानिध्यात त्याची रोपे रुजून येतात. पिंपळाचे झाड सहसा कोणाकडून तोडले जात नाही. पिंपळाचे लाकूड हलके व बांधकामास निरुपयोगी असते. पिंपळाच्या झाडाला भारतीय संस्कृतीत धार्मिक महत्त्व आहे.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विश्वकोश (https://marathivishwakosh.org/2268/)

2) मराठी विकिपिडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3)

Share Tweet Follow Share Email Share