पोपया

पपईला गावात ‘पोपया’ म्हणतात. पोपयाची गावात व्यावसायिक तत्त्वावर मोठ्या प्रमाणात लागवड नाही. घरांच्या आजूबाजूला एखाद-दुसरे पोपयाचे झाड लोकांनी लावलेले आढळते. साधारणपणे १० फूट उंचीची पोपयाची झाडे गावात आढळतात. यात काही गावठी पारंपरिक वाणे आहेत, तर काही बाहेरून आणून लावलेली आहेत. पोपयाच्या झाडाला रोज नियमितपणे पाणी द्यावे लागते. नवीन रोप रुजून आल्यानंतर दोन-तीन वर्षांमध्ये झाडाला पोपये धरायला लागतात. पोपये मुख्यतः खाण्यासाठी वापरतात. कच्च्या पोपायांची भाजी केली जाते, मात्र हा गावात फारसा लोकप्रिय पदार्थ नाही.

Share Tweet Follow Share Email Share