रानभेंडी  

(Abelmoschus manihot)

रानभेंडी ही गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला, आगरांमध्ये फिकट पिवळ्या पाकळ्या आणि मध्यभाग तपकिरी असणाऱ्या जास्वदींसारख्या सुंदर फुलांवरून ही वनस्पती ओळखता येते. ही वनस्पती साधारणतः ३ ते ५ फूट उंच वाढते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी, वा अन्य उपयोग गावात फारसा केला जात नाही.

 

इंग्रजीमध्ये सामान्यपणे हिला Sweet Hibiscus असे म्हणतात. रानभेंडी ही खाद्य आहे. भारतात तसेच जगात अनेक ठिकाणी भाजीसाठी वा अन्य पदार्थांमध्ये ही वापरली जाते. पानांचा वापरही अनेक पदार्थांमध्ये केला जातो. भरपूर पोषणमूल्यांनी युक्त अशी ही वनस्पती आहे.

अधिक माहितीसाठी संदर्भ:

1) (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Sweet%20Hibiscus.html)

रानभेंडीची भाजी (पडेल येथील निसर्गअभ्यासक वसंत काळे यांच्या फेसबुक वॉल वरून साभार)
Share Tweet Follow Share Email Share