रानहळद  (Curcuma aromatica)
 

रानहळद ही पावसाळ्यात उगवणारी एक अत्यंत औषधी वनस्पती आहे. पावसाळा सुरु होण्याच्या सुमारास जमिनीतील कंदाला अंकुर फुटून रानहळदीची जांभळट गुलाबी रंगाची फुले जमिनीलगत रुजून येतात व त्यापाठोपाठ पाने फुटतात. डोंगरउतारावरील भागात, आगरांमध्ये ही वनस्पती खास करून आढळते. ही वनस्पती साधारणतः १ ते २ फूट उंच वाढते. रानहळदीची हळकुंडांसारखी मुळे औषधी आहेत.  गुरे ही वनस्पती सहसा खात नाहीत. या वनस्पतीचा परंपरागत औषधी उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. महाराष्ट्राच्या विविध भागांत हिला ‘शिळंद’, ‘गौरीचे हात’ अशी विविध नावे आहेत.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1)  (https://www.facebook.com/bhavatal/posts/pfbid02YM6UmcGesHoqnht9KCgZHbbXtoBtdrNV2Hb8dUSqtcs8G8iMmcKekkWpkpBve9GVl)

2)

फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Wild%20Turmeric.html)

Share Tweet Follow Share Email Share