रानमेथी (Desmodium triflorum)    

रानमेथी ही गावात पावसाळ्यात रुजून येणारी, तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. ही वनस्पती अगदी जमिनीलगत, जेमतेम अर्धा इंचच वाढते. गर्द हिरव्या गोल बारीक पानांवरुन ही सहज ओळखता येते. गुरे ही वनस्पती खातात. पावसाळा अखेरीस हिला जांभळट गुलाबी रंगाची फुले येतात व जमिनीलगत फुलांचा गालिचा सुंदर दिसतो. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –  (https://indiabiodiversity.org/species/show/229506)
Share Tweet Follow Share Email Share