रेणवी
स्थळ – पंगेरे खाडी
छायाचित्र – आशिष पाटील

 
रेणवी (Sillago sihama)
 

रेणवी हा खाडीत आढळणारा छोट्या आकाराचा व लोकांचा आवडता  मासा आहे. या माशाचे वजन जास्तीत जास्त अर्धा किलोपर्यंत असते. लांबी साधारणपणे ८ ते १० इंच असते. रुंदी ३ ते ४ इंच असते. रंग चंदेरी असतो. पावसाळ्यात हा मासा तुलनेने जास्त प्रमाणात मिळतो. तळून वा रस्सा करून हा मासा खाल्ला जातो. याचा बाजारभाव हा आकारानुसार असतो. पूर्ण वाढ झालेल्या माशाला बाजारात ७५० ते ८०० रु. किलो, तर मध्यम आकाराच्या माशाला ५०० रु. किलोपर्यंत भाव मिळतो. याला शहरांमध्ये जास्त मागणी आहे. या माशाला ‘सुळा’ असेही नाव आहे.

शास्त्रीय दृष्ट्या हा मासा ‘सिलिगिनिडी’ या कुळात मोडतो. इंग्रजीमध्ये या माशाला Silver Sillago असे सामान्यपणे म्हणतात. सागरी, निमखाऱ्या, तसेच गोड्या पाण्यातही हा मासा आढळतो. हिंदी महासागर, पॅसिफिक महासागराचा पश्चिम भाग, आशिया व आफ्रिका खंडाच्या अनेक भागांमध्ये या माशाचा आढळ आहे. रेणवी माशाचं ‘तिखलं’ हा कोकणातला एक लोकप्रिय पदार्थ आहे.

 

माहिती साहाय्य –
१) पंगेरेवाडी ग्रामस्थ
२) सायली नेरुरकर (सागरी जीवशास्त्र अभ्यासक)

 

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

(https://en.wikipedia.org/wiki/Northern_whiting)

 
Share Tweet Follow Share Email Share