सागवान (Tactona grandis)
 

सागवानाची लहान, मध्यम व मोठया उंचीची झाडे गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळतात. गावठाण भागात सागवान जास्त प्रमाणात आहेत. इमारती बांधकामासाठी व छोट्या लाकडी वस्तू बनवण्यासाठी सागवानाचा वापर गावात सर्रास होतो. सागवानाचे झाड साधारणतः १५ तें २० वर्षांचे झाले की जून तोडण्यायोग्य होते. तोडल्यानंतर तिथेच नवीन फुटवे येतात. ३०-४० वर्षे जुने सागवानही गावात सामान्य प्रमाणात आहेत. सागवानाची मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक लागवड गावात कुठे आढळत नाही. घराच्या आजूबाजूच्या जागेत दोन-चार सागवानाची झाडे लोक ठेवतात.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) (https://vishwakosh.marathi.gov.in/25462/)

     

Share Tweet Follow Share Email Share