सांजवेल (Rivea hypocrateriformis)    

सांजवेल ही गावात पावसाळ्यात सामान्य सडे व डोंगरउताराच्या भागात सामान्यपणे आढळणारी वनस्पती आहे. मारुतीच्या देवळापासून खाली उतरणाऱ्या डोंगरावर ही दरवर्षी हमखास आढळून येते. ऑगस्ट-सप्टेंबरच्या सुमारास हिला पांढरी धोत्र्यासारखी, परंतु लहान फुले येतात. पाने बदामाकृती, मध्यम आकाराची असतात. फुले सकाळी व संध्याकाळी उमलतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –
1) (https://www.facebook.com/groups/767877490681101/posts/1006537310148450)

2) (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Midnapore%20Creeper.html)

Share Tweet Follow Share Email Share