शमी (Prosopis cineraria) 

शमीची लहान झाडे (५ ते १० फूट) गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळतात. दसऱ्याला सोने लुटण्यासाठी आपट्याच्या पानांऐवजी शमीची पाने गावात वापरली जातात. शमीचा अन्य कोणता खाद्य वा औषधी उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. छायाचित्रात दाखवलेल्या झाडाला ‘शमी’ म्हणावे की ‘दुरंगी बाभूळ’ म्हणावे याबाबत संभ्रम आहे, परंतु गावात सगळे लोक या झाडाला ‘शमी’ याच नावाने संबोधतात.

     

Share Tweet Follow Share Email Share