शेग 

शेग हा खाडीत वर्षभर मिळणारा व लोकांचा आवडता मासा आहे. याला ‘बोयटा’ असेही म्हणतात. मोठा वाढल्यावर याला ‘शेडा’ असे म्हणतात. ‘गुंजी’ ‘पोकळा’ अशीही अन्य नावे आहेत. लहान माशाची लांबी ५-६ इंच, तर मोठ्या माशाची लांबी १ फुटांपर्यंत असते.  छोट्या माशाचे वजन ४०० ग्रॅमपर्यंत, तर मोठ्या माशाचे वजन ८०० ग्रॅम ते १ किलोपर्यंत भरते. बाजारात याला २५० ते ३०० रु. भाव मिळतो.

(माहिती स्रोत – पंगेरेवाडी ग्रामस्थ)

Share Tweet Follow Share Email Share