शेतक
स्थळ – पंगेरे खाडी
छायाचित्र – आशिष पाटील

 
शेतक
 

शेतक हा खाडीत नेहमी आढळणारा मासा आहे. याची लांबी ४ ते ५ इंचांपर्यंत तर रुंदी अर्धा ते १ इंचापर्यंत असते. वजन साधारणपणे २०० ग्रामपर्यंत भरते. रंग चंदेरी असतो. हा मासा गळाने मिळत नाही. डोळीमध्ये वा पांग टाकून हा मिळतो. पावसाळ्यात हा मासा जास्त प्रमाणात मिळतो. टाळून वा रसा करून हा खाल्ला जातो. बाजारात याला साधारणतः २०० ते ३०० रु. किलोपर्यंत भाव आहे. बारक्या शेतक माशांना ‘चरबाटी’ असे म्हणतात.

 
(माहिती स्रोत – पंगेरेवाडी ग्रामस्थ)
 
 
Share Tweet Follow Share Email Share