शेवळ (Amorphophallus commutatus)
शेवळ ही पावसाळ्याच्या सुरुवातीला उगवणारी एक अल्पायुषी वनस्पती आहे. दाट झाडी असलेल्या भागात शेवळ रुजून येते. याची उंची जास्तीत जास्त ३ ते ४ फुटांपर्यंत असते. याला ‘आधेलेफोक’ असेही एक नाव आहे. गावात काही लोकांनी ‘चोरो’ असेही एक नाव सांगितले. या वनस्पतीची भाजी करून खातात अशी माहिती स्थानिक लोकांकडून मिळते, परंतु सर्रासपणे नेहमीच्या आहारात याचा वापर केला जात नाही. पावसाळ्याचा जेमतेम पहिला महिनाभर ही वनस्पती दिसते.
अधिक माहितीसाठी संदर्भ –
1(https://www.facebook.com/groups/2947552148847722/permalink/3008462319423371/)
2(http://www.flowersofindia.net/catalog/slides/Dragon%20Stalk%20Yam.html)
शेवळ - दि. ७/६/२०२२, स्थळ: अणसुरे वरचा वठार, छायाचित्र - प्रशांत देसाई
Share Tweet Follow Share Email Share