शिंदाणे
स्थळ – पंगेरे खाडी
छायाचित्र – आशिष पाटील

 
शिंदाणे
 

शिंदाणे हा शिंपल्यांचा प्रकार खाडीत आढळतो. पंगेऱ्याचा बांध, दांडे पूल अशा काही ठराविक वाहत्या पाण्याच्या ठिकाणीच हे मिळतात. शिंपल्यात अगदी बारीक आकाराचा जीव असतो. हे जास्तीत जास्त तळहाताएवढेही मोठे होतात. तळून वा आमटीत टाकून हे खाल्ले जातात. मार्च ते जून या हंगामात हे काढले जातात. जून नंतर उरलेले खराब होऊन जातात. हाताने हे शिंदाणे काढले जातात. हे कष्टाचे काम असते. छोटे असल्यास यांना बाजारात १५० ते २०० रु. शेकडा, तर मोठे असल्यास शेकड्याला ५०० रुपयांपर्यंत भाव मिळतो.

(माहिती स्रोत – पंगेरेवाडी ग्रामस्थ)

Share Tweet Follow Share Email Share