शिवण (Gmelina arborea)
 

शिवणीची मध्यम ते मोठ्या उंचीची झाडे (२० ते ४० फूट) गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळतात. फळ्या पाडण्यासाठी, तसंच छोट्या लाकडी वस्तू, फर्निचर बनवण्यासाठी शिवणीच्या लाकडाचा वापर सर्रास केला जातो. शिवणीचे झाड तोडल्यानंतर तिथेच पुन्हा फुटवे येऊन नवीन झाड वाढते व १५-२० वर्षांत लाकूड जून होते. लाकूड टिकावू होण्यासाठी लोक थोडे दिवस खाऱ्या पाण्यात ठेवतात. लाकडाला पांढरेपणा असतो. शिवणीची फुले आणि फळे हे गुरांचे आवडते खाद्य आहे. जळवणासाठी शिवणीचे कवळ तोडले जातात.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) विकिपिडिया (https://vishwakosh.marathi.gov.in/33528/)

शिवणीच्या फळ्या
Share Tweet Follow Share Email Share