छायाचित्र – उन्मेष परांजपे

स्थळ: लक्ष्मी-नारायण वाचनालयाजवळ

शुभ्रकंठी कस्तुर

शुभ्रकंठी कस्तुर हा गावात सर्वत्र नेहमी आढळणारा पक्षी आहे. घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, बागांमध्ये, डोंगरउताराच्या जागेत हा दिसतो. हा विशेष करून जमिनीवर वावरतो. जमिनीवरच्या अळ्या, किडे इ. खातो. २ ते ४ या संख्येत हे पक्षी दिसतात. मार्च ते मे या कालावधीत खूप वेगवेगळ्या सुंदर आवाजांमध्ये हा पक्षी गातो. एका ठिकाणी बसून बराच वेळ ओरडत राहतो. शामा पक्ष्याच्या तुलनेत या पक्ष्याचा आवाज किंचित कर्कश असतो.

Share Tweet Follow Share Email Share