सुगंधा (Aegiceras corniculatum)

सुगंधा/काजळा ही गावात कांदळवन पट्ट्यात विपुल प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. दांडे खाडी, अणसुरे खाडी, भराडे, हुर्से इ. सर्व भागांतील कांदळवन पट्ट्यात ही आढळते. बोटाएवढ्या लांबीच्या शेंगा आणि पांढरीशुभ्र सुगंधी फुले यांवरून ही ओळखता येते. या वनस्पतीची उंची जास्तीत जास्त ५ ते ७ फुटांपर्यंत असते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) (https://en.wikipedia.org/wiki/Aegiceras_corniculatum)
Share Tweet Follow Share Email Share