सुगरण (मादी)
दि. ३१/१/२०२२
ठिकाण – वाकी सडा
छायाचित्र: सुहास गुर्जर

सुगरण  (Baya weaver)

सुगरण हा गावात सामान्य प्रमाणात आढळणारा पक्षी आहे. गावात खाडीकिनारी माडांवर सुगरणी घरटे करतात. १५ ते २० च्या समूहाने सुगरणी एका ठिकाणी आढळतात. एका वेळी एका ठिकाणी १०-२० किंवा कधीकधी १०० च्या संख्येनेदेखील सुगरणी आढळतात. भातशेतीच्या ठिकाणी हा पक्षी खास करून आढळतो. सुगरणीची घरटी गावात खाडीकिनारी भरपूर प्रमाणात आढळतात.

Share Tweet Follow Share Email Share