सुरण 

(Amorphophallus aspera)

सुरण ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी रानभाजी आहे. पावसाळ्यात सुरणाचे कंद रुजून येतात. लूत आणि सुरण यात बरेच साम्य दिसते, मात्र खोडाच्या पांढरेपणावरून सुरण ओळखता येतो. लोक आपल्या घराच्या आजूबाजूच्या जागेत, परसवात नैसर्गिकरित्या रुजून आलेल्या सुरणाची लागवड करतात. पुरेसा मोठा झाल्यावर सुरण खणून काढला जातो. २ किलो, ५ किलो वा त्यापेक्षा जास्त वजनाचे सुरणाचे कंद जमिनीखाली मिळतात. ते अनेक दिवस टिकतात. सुरणाची भाजी गावात आवडीने खाल्ली जाते. सुरणाची भाजी आरोग्यदायी आहे. सुरणाचे फुल मोठे असते व ते क्वचित आढळते. पावसाळा सुरु होण्यापूर्वी सुरणाची फुले क्वचित कुठेतरी आढळतात. फुलाला किंचित दुर्गंध असतो. फुलाचा खाद्य वा अन्य औषधी उपयोग केला जात नाही. सुरण आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये विपुल प्रमाणात आढळणारी रानभाजी आहे. भारतात आणि श्रीलंकेत याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. खाज लागू नये म्हणून सुरण चांगला उकडवून घेतात. 

संदर्भ –

मराठी विश्वकोश (https://vishwakosh.marathi.gov.in/25981/

सुरणाचे फूल (छायाचित्र - लवू कणेरी, स्थळ - शेवडी वाडी, दि. २८/५/२०२२
Share Tweet Follow Share Email Share