सुरंगी (Mammea suriga)
सुरंगीची मध्यम उंचीची झाडे गावात तुरळक प्रमाणात आहेत. मोठे वृक्ष पूर्वी गावात होते असे अनुभवी लोक सांगतात. आडीवाडी, लक्ष्मीनारायण मंदिर, भावकाई मंदिर या परिसरात सुरंगीची एक-दोन मोठी झाडं आहेत. गर्द हिरवी पाने असणाऱ्या या झाडाला फेब्रुवारी-मार्चच्या सुमारास पांढरी अत्यंत सुगंधित फुले येतात. मधमाशांसाठी सुरंगीची झाडं अत्यंत महत्त्वाची आहेत. सुरंगीत नर आणि मादी असे दोन प्रकार असतात व फुलाचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर त्यातील फरक लक्षात येतो. महिला सुरंगीच्या कळ्यांचे गजरे करून डोक्यात माळतात.

3) दै. सकाळ (https://www.esakal.com/agro/sindhudurg-news-mammea-suriga-surangi-flower-special-story-110133)

Share Tweet Follow Share Email Share