स्वर्गीय नर्तक – मादी                                                                    

स्थळ – लक्ष्मी-नारायण वाचनालयाशेजारी

दि. १/२/२०२२
छायाचित्र: सुहास गुर्जर

स्वर्गीय नर्तक (Indian Paradise Flycatcher)

स्वर्गीय नर्तक हा गावात तुरळक प्रमाणात दिसणारा पक्षी आहे. याला ‘नारद बुलबुल’, ‘सुरंगी’ अशीही नावे आहेत. साधारणतः नोव्हेंबर ते एप्रिल यादरम्यान हा पक्षी नजरेस पडतो. गावात हा पक्षी स्थलांतरित आहे. याची मादी दोन-तीन च्या संख्येने दिसते. पांढऱ्या रंगाचा लांब शेपटी असलेला नर क्वचित नजरेस पडतो. नरांमध्ये पूर्ण वाढ झालेला आणि पूर्ण वाढ न झालेला असे दोन प्रकार वेगळे ओळखू येतात. पूर्ण वाढ न झालेला नर मादीसारखाच तपकिरी दिसतो, परंतु शेपटी लांब असते. पूर्व वाढ झाल्यानंतर नराचा रंग पांढरा होतो. हा पक्षी हवेतल्या माशा, कीटक पकडून खातो.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) Wikipedia (https://en.wikipedia.org/wiki/Indian_paradise_flycatcher)

Share Tweet Follow Share Email Share