टाकळा (Cassia tora)
 

टाकळा ही पावसाळ्यात रस्त्याकडेला, तसेच गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारी रानभाजी आहे. टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. जून झालेला टाकळा खाण्यास निरुपयोगी. टाकळा एक ते दीड फूट उंच वाढतो. टाकळ्याची भाजी पोटाला चांगली असते. पावसाळा अखेर टाकळ्याला पिवळी बारीक फुले येतात व शेंगा धरतात. गुरे टाकळा खात नाहीत.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विश्वकोश (https://marathivishwakosh.org/19033/)

Share Tweet Follow Share Email Share