तांबडा मंदार (Bauhinia variegata)

 

सर्वसामान्यपणे ‘कांचन’ म्हणून ओळखला जाणारा हा वृक्ष गावात ‘तांबडा मंदार’ म्हणून ओळखला जातो. हा गावात अतिदुर्मिळ आहे. गावात तांबड्या मंदारच्या साधारणपणे १५ फूट उंचीच्या एकाच झाडाची नोंद झाली आहे. झाड व पाने कांचनासारखीच असतात. फुले गुलबट तांबडी, मोठी असतात. जानेवारी-फेब्रुवारीच्या सुमारास हे झाड पूर्ण फुलते व मागाहून शेंगा येतात. या झाडाचा औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

(https://vishwakosh.marathi.gov.in/16251/)

Share Tweet Follow Share Email Share