तांबरवेल (Ipomoea campanulata)

 

तांबरवेल ही वेलवर्गीय वनस्पती गावात काही ठिकाणी सामान्य प्रमाणात आढळते. आडीवाडी, म्हैसासुरवाडी येथे ही वनस्पती आढळली आहे. म्हसासुरवाडीच्या गिरेश्वर बाजूकडील डोंगरउतारावर ही वनस्पती विपुल प्रमाणात आढळून येते. पान मोठे, जाड, गर्द हिरवे व बदामाकृती असते. जानेवारी-फेब्रुवारीच्या सुमारास या वनस्पतीला मोठी मध्यभागी गुलाबी भाग असलेली पांढरी सुंदर फुले येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) Flowers of India (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Tambarvel.html)

2) India Biodiversity Portal (https://indiabiodiversity.org/species/show/230032)

Share Tweet Follow Share Email Share